10 May 2012

निष्पंख...!

साऱ्या प्रात:निष्ठा छातीपोटाशी घेऊन...
काहीजण...उभे आहेत..कळसांवर...झरोक्यांत...
तेजोवलयं सांभाळत...
साकल्याच्या दिशा लेऊन...
पाहत आहेत...
येणाऱ्या सूर्यांची वाट...

बाकी सारं स्तब्ध...
भिंतींचे चिरेही..नि:शब्द...
त्यांच्यात उगवलेलं एखादं...
पिंपळाचं झाड वाऱ्याशी बोलत आहे...
तेवढंच..

बाकी सगळ्यांकडे...रात्रंच...
त्या निद्रिस्तांच्या तर...
स्वप्नांतही नाहीयेत...
नि:संग पंखांच्या भाषा...

त्यांचं तर आभाळही...

निष्पंख...!


          ....चैताली.

काही पक्षी...

कोणी आलंच तर...
सांग मी नाहीये म्हणून...
माझ्यातले काही पक्षी...
दूर गावा गेलेत...
आकाशांदरम्यान त्यांनी..
पसरलेले पंखच...
आता माझ्या डोळ्यांत उतरले आहेत...
.
पुन्हा ओळख-बिळख
शोधत बसतील...
माझ्या बिन-चेहऱ्यावर लोक...

(माझी काही पीसं...
ठेव मात्र जपून...!)


      ....चैताली.




24 April 2012

Swami



Sprouted me…
Growing into a tree…
My roots deep in the Earth…
Soaking all the pain, journeys and lies….

Greener than me.…
He is there…
And He has Branches…
All over the skies…
             
                …..chaitali.

19 April 2012

तुफ़ानी....!

चल..
काहीतरी creative करू...
तोडमोडके पुराना..
काहीतरी new seek करू..

मी Doremon..तू रडका Nobita..
कार्टून प्रश्नांसाठी..
अवघड gadgets बनवू...

खोलीभर पसरलेल्या..
सकर्मक-अकर्मक प्रश्नांचे कपचे उचलत...
उफराटे (उरफाटे) उत्तर-पाणी खेळू...

अंधार पाळणाऱ्या काटेकोर रातीला...
डिम लाईट्स ची दाखवू भिती..
एकमेकांच्या उश्यांची पिसं काढत..
बेडवर झोपवू चालीरीती...

"Gender- the जानवर " मूव्ही बघताना...
"अंतर्वस्त्र" एक्सचेंज करू..
मग लख्ख सारं सारं पुसून...
अनोळखी चेहऱ्याने..
घट्ट मिठी मारू...

चल ना यार...
आज कुछ तुफ़ानी करू...!

         ...चैताली.

16 April 2012

The wind-chimes…

Peeping through the window…
Clumsy rain brings.…
A day long memory….
Which seems too old…
“Wait… Let me go through the summary..”
I told it hastily….
….
Pages after pages of you ….
Not a chapter of mine to read….
"Are you there???" asked me...
Or may be..
Just the sound of tricky wind….

Now I can hear the signs…
Outside it is the rain….
.
And inside....
The wind-chimes…

    …..Chaitali.

11 April 2012

झग्ग रंग...

झग्ग रंग...

विझ्झं सूर्य...

कविता माझ्या....

तूही जग्गं...!

         ....चैताली.

07 April 2012

मला कळतं...!

मला कळतं...!
असं म्हटलं ना....
की दारं बंद करतो आपण...
निचरा-निचरा होऊन येतं सारं....
इतकं परफ़ेक्ट की...
आपण पाळायला लागतो ते...
फ़्रेम करून...भिंतीवर लाऊन...

हाताची घडी...चष्मा लाऊन बघताना...
स्वत:वरच खुष होत...
डोळे मिटून...
गलेलठ्ठ..साचेबद्ध मांजर होतो आपण...!

अं..हं..! नकोच ते...
मग काय करावं...
फटीऐवजी.. मोठ्ठं अवकाश घ्यावं..
मोकळं एकदम...

हात पसरून.. डोळे बंद करून..
उभं राहावं त्याखाली...
धपाधप..धडाधड...
सारं सारं...येऊ द्यावं अंगावर....

मग हळूच डोळे उघडून...
एक-एक निरखत...चापसत...
आवडलेलं खिशात भरून घ्यावं...
लब्बाड मुलीसारखं...!


        .....चैताली.